आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:मेसेज पाठवल्याच्या वादातून हाणामारी

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाईलवर मेसेज पाठविल्याच्या वादातून दोन गटात पिंपरी घुमट (ता. नगर) येथे हाणामारी झाली. या संदर्भात एमआयडीसी ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. सोमवारी (१५ ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली. किशोर रेवननाथ होडगर (रा. पिंपरी घुमट) यांनी फिर्याद दिली आहे. मोबाइलवर मेसेज का केला, या कारणावरुन तबाजी होडगर व अशोक सुळ यांनी मारहाण केली.

यावेळी पळालो असता विकास रभाजी सुळ व सुभाष होडगर यांनी पाठीत दगड फेकून मारला. त्यानंतर रभाजी सुळ, विशाल सुळ, दादा सुळ, पोपट होडगर, बन्शी होडगर, बाबासाहेब होडगर, दीपक होडगर यांनी मारहाण केली. सुभाष व तबाजी होडगर यांनी जिवे मारण्याची धमकी दिली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. विशाल सुळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, किशोर होडगर याने मेसेज का केला, या कारणावरुन मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...