आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:32 कोटींच्या भूखंडावरून नगरच्या काँग्रेसमध्ये संघर्ष, नगरसेवकांविरुद्ध शहराध्यक्षांचे आंदोलन

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी देशभर ‘भारत जोडो’ यात्रेतून पक्ष बळकट करत आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर काँग्रेसमध्ये ३२ कोटींच्या भूखंड ठरावावरून अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. शहराध्यक्षांनीच नगरसेवकांविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. दफनभूमीसाठी ३२ कोटी खर्चून भूखंड खरेदी करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी केली, तर काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे यांनी मात्र आपल्या चार नगरसेविकांना त्यास विरोध करण्याच्या सूचना जाहीररित्या दिल्या. मनपा आयुक्तांकडे विरोधाची पत्रे देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला. पण त्याबाबत खात्री नसल्याने पत्र दिले नाही तर त्या नगरसेवकांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असे काळे यांनी सांगितले. त्यामुळे शहर काँग्रेसमधील अंतर्गत वातावरण चांगलेच तापले आहे.

बातम्या आणखी आहेत...