आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:कॅन्टोन्मेंट नाक्यावर टोळक्याकडून हाणामारी ; सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल

नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड रोडवरील कॅन्टोन्मेंट नाक्यावर राडा झाला असून, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. रवी उर्फ धरम मुन्नु स्वामी (वय ४५, रा. सदर बाजार, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये अमोल काळे, संदीप म्हस्के, संतोष काळे, शुभम काळे, तुषार काळे, स्वप्नील काळे, सुरज शेळके यांचा समावेश आहे. मारहाणीत फिर्यादी रवी जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान आरोपींनी नाक्याची पावती फाडण्यावरून वाद करून फिर्यादीसह त्यांचा सहकारी विष्णू गव्हाणे याला लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. पोलिस हेड कॉन्स्टेबल राठोड अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...