आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:बोल्हेगाव फाट्यावर दोन गटात धुमश्चक्री

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्हेगाव फाटा येथे गणेश मंडळात नाचण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या वादातून दोन्ही गटातील तरूणांना लोखंडी रॉड, गज, चाकू, लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाग्येश ऊर्फ गोट्या मधुकर नाकाडे (वय ३१, रा. नागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय ठाणगे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), चंद्रकांत अशोक कोकाटे व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत फिर्यादी स्वत: व त्यांचे मामे भाऊ चैतन्य अशोक बडे, श्रीराम बाबासाहेब बडे, प्रतिक राजेंद्र कांबळे (सर्व रा. नागापूर) हे जखमी झाले आहेत. दुसऱ्या गटाचे अक्षय राजेंद्र ठाणगे (वय २५ रा. एमआयडीसी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चैतन्य अशोक बडे, दादा ऊर्फ प्रतिक कांबळे, राम बाळासाहेब बडे, भाग्येश नाकाडे (सर्व रा. नागापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत फिर्यादी स्वत: व चंद्रकांत अशोक कोकाटे जखमी झाले आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...