आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर अर्बन बँक:कर्जदाराच्या सह्या नसतानाही इतर खात्यात रकमा केल्या वर्ग ; गायकवाडच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर अर्बन बँकेच्या १५० कोटींच्या फसवणूक प्रकरणाच्या तपासात अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत. कर्जाच्या रकमेच्या गैरवापर करताना सदर रकमा कर्जदाराच्या सह्या नसतानाही इतर खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संचालकांना अंधारात ठेवून हा प्रकार केला की, संचालकांच्या सांगण्यावरून, याचा तपास आता होणार आहे. त्यामुळे बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संचालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

बँकेच्या २८ संशयास्पद कर्जखात्यांसह सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची १५० कोटीची फसवणूक केल्याची तक्रार नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दिली होती. कोतवाली पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण आव्हाड करत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी सचिन गायकवाड याला अटक केली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पोलिस कोठडीची मुदत २३ जूनपर्यंत वाढवून जिल्ह्याचे तपासी अधिकारी आव्हाड यांनी सांगितले.

कर्जाच्या रकमेचा गैरवापर होत असताना व या रकमा दुसऱ्या खात्यात वर्ग करताना त्यावर कर्जदार व आरोपी गायकवाडच्या सह्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता बळावली आहे.

बँकेच्या संचालकांना अटक करा नगर अर्बन बँकेच्या १५० कोटीच्या फसवणूक प्रकरणी बँकेच्या संचालकांना अटक करण्याची मागणी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी केली आहे. संचालक मंडळाने नियम न पाळता, बनावट कागदपत्रे घेवून इतर बँकांमध्ये थकबाकीदार कर्जदारांना कोट्यवधीची कर्जे दिली, असा आरोप गांधी यांनी केला.

अनियमिततेचाही होणार तपास कर्जासाठी तारण ठेवलेल्या मालमत्तांचे व्हॅल्यूएशन रिपोर्ट बनावट असल्याचा प्रकारही यापूर्वीच पोलिस तपासात समोर आलेला आहे. त्यामुळे कर्ज प्रकरणाच्या मंजुरीच्या प्रक्रियेतील अनियमिततेचाही तपास केला जाणार आहे. परिणामी, यात मंजुरी देणारे बँकेचे पदाधिकारी व संचालकही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...