आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथर्डी शहराचे आराध्य दैवत असणाऱ्या रामगिरीबाबा यांचा यात्रा उत्सव भव्य स्वरुपात गुडीपाडवा या दिवशी साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामगीरीबाबा मंदिर व टेकडीची स्वच्छता बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांकडून करण्यात आली.
या टेकडी परिसरात असणाऱ्या काटेरी झुडपे, गवत, प्लास्टिक, कचरा जमा करून त्याचे कायमस्वरूपी निर्मुलन करण्यात आले तसेच जागोजागी असलेले मातीचे ढीग सपाट करण्यात आले तसेच तेथील अनावश्यक घनकचरा काढून टाकल्यामुळे मंदिर परिसर प्रशस्त व स्वच्छ दिसू लागला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे व एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक रामनाथ बंग, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, सुमित तरवडे, संजय कुलकर्णी, पोपट गुरव, सागर बागडे, सचिन रत्नपारखी, संजय गुरसाळी, सचिन सपकाळ, डॉ. सुभाष शेकडे, डॉ. अशोक कानडे, डॉ. अरुण राख आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.