आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:कचरा वेचक महिलांचे स्वच्छतेचे‎ कार्य समाज हिताचे : महापौर‎

नगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर कचरा वेचक महिलांचे कचरा‎ वर्गीकरणाचे काम जोखमीचे आहे.‎ कार्यशील काच, पत्रा, ब्लेड आदी‎ धारदार व गंजलेल्या वस्तू गोळा‎ करताना इजा होते. या महिलांच्या‎ आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. कचरा‎ वेचक महिलांचे स्वच्छतेचे कार्य‎ समाज हिताचे आहे. त्यांना विमा‎ पॉलिसी मनपाचे ओळखपत्र आदी‎ सुविधा माच्या माध्यमू मिळून देऊ,‎ असे आश्वासन महापौर रोहिणी‎ शेंडगे यांनी दिले‎ मनपाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण‎ व माझी वसुंधरा अंतर्गत जागतिक‎ कचरा वेचक दिनानिमित्त आयोजित‎ कचरा वेचकांची परिषद झाली.‎

यावेळी महापौर शेंडगे यांच्या हस्ते‎ ९० महिलांना साडी देऊन सत्कार‎ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त‎ आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, स्थायी‎ समिती सभापती गणेश कवडे,‎ मनपा महिला बालकल्याण समिती‎ सभापती पुष्पा बोरुडे, भाऊसाहेब‎ उडानशिवे, माजी नगरसेविका‎ गिरीजाबाई उडानशिवे आदी‎ उपस्थित होते.‎ महापौर शेंडगे म्हणाल्या,‎ पालिकेचे स्वच्छता कर्मचारी जिथे‎ पोहोचत नाही तिथे कचरा वेचक‎ महिला जाऊन स्वच्छतेचे काम‎ करत असतात.स्थायी समिती‎ सभापती कवडे म्हणाले, कचरा‎ वेचकाचे काम समाजासाठी सेवा‎ घडत असते. कचरा गोळा करून‎ वर्गीकरण करतात त्यावेळी त्यांना‎ इजा होते. म्हणून त्यांना विमा‎ पॉलिसी मनपाकडून मिळावी त्यांचे‎ आरोग्य निरोगी असावे, असा प्रयत्न‎ महापालिकेच्या माध्यमातून करावा.‎

अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारे‎ म्हणाले, कचरा वेचकांच्या‎ कामाचे कौतुक करतो. महिलांनी‎ काम करत असताना हातामध्ये‎ सॉक्स घालून काम करावे,‎ कचऱ्यात विषारी पदार्थ असतात.‎ त्यापासून त्यांच्या आरोग्यास‎ धोका निर्माण होऊ शकतो. या‎ महिलांच्या रोजगारीचा प्रश्न‎ सोडवण्यासाठी संबंधित‎ ठेकेदाराकडून त्यांना दैनंदिन काम‎ मिळवून देण्याचे आश्वासन‎ यावेळी दिले.‎

बातम्या आणखी आहेत...