आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्याचे भूमीपुत्र सुरज गायकवाड यांच्यामार्फत बांगलादेश येथे तिसरी ग्लोबल चेंजमेकर्स समिट आणि पुरस्कार वितरण आयोजित करण्यात आले होते. ज्याची थीम नवीनता, शिक्षण आणि हवामान कृतीसाठी नेतृत्व होती. ह्युमन हार्मनी नेपाळ आणि एच. अँड एच. इंटरनॅशनल फाउंडेशन बांगलादेश यांच्या भागीदारीत प्रोजेक्ट १०० इंडियाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नवकल्पना, शिक्षण आणि नेतृत्वाची तातडीची गरज यावर चर्चा करण्यासाठी जगभरातील नेत्यांना एकत्र आणून हा कार्यक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद शहरयार आलम, कोसोवा दूतावासाचे राजदूत गुनेर उरेया, नेपाळच्या मिशन दुतावासाच्या उपप्रमुख ललिता सिलवाल, संसद सदस्य आणि ढाका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे अध्यक्ष आणि ब्रिगेडियर जनरल बॅरिस्टर शमीम हैदर पटवारी, माजी ब्रिगेडियर जनरल निवडणूक आयुक्त डॉ. सखावत हुसेन, माजी कुलगुरू ब्रॅक विद्यापीठ आणि माजी देशाचे प्रतिनिधी आययूसीएन डॉ. अन्नुन निशात, हमदर्द विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तन्वीर खान, माजी सचिव आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, ऊर्जा आणि खनिज संसाधन मंत्रालय बांगलादेश एम. नसीर उद्दीन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. ३० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना हवामान बदलाशी संबंधित विविध कारणे आणि क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.