आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री ढगफुटी सदृश जोरदार:नेवाशात ढगफुटी सदृश पाऊस

नेवासे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसाने तालुक्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश जोरदार पावसाने हजेरी लावली. नेवासा खुर्द परिसरात कमी वेळेत सुमारे ४ इंच पाऊस झाल्याने परिसरातील अनेक ओढे-नाल्यांना पूर आल्याने गावागावांचा संपर्क तुटून वाहतूक बंद झाली होती, तर ऊस, मका, कडवळ, कपाशी,सोयाबीन पिकात मोठे प्रमाणात पाणी साचून आहे.

गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस पहाटे सहा वाजे पर्यंत सुरू होता. नेवासे शहरासह तालुक्यातील काही गावांत ७५ ते ८० मिलिमीटर पेक्षाही जास्त पाऊस झाल्याचा अंदाज आहे. नगर औरंगाबाद महामार्गावरील निमगाव येथील त्रिवणेश्वर मंदिराचा संपूर्ण गाभारा भर पावसाचे पाणी साचले होते. मंदिराचा गाभारा पूर्ण भरून गेला होता. या परिसरातील व सुरेश नगर येथील सर्वच दुकानांत व गावात घराघरांत पाणी शिरलेले होते. उत्तर दुमाला व नेवासे शहराच्या अनेक वाड्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे रात्री ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. रानमळा उस्थळ रोड व शहर लगतच्या शेतांत पाणी साचल्यामुळे कपाशी आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. नेवासे परिसरात ९९ मिमी पावसाची झालेली नोंद यावर्षीचा सर्वात मोठा पाऊस दर्शवते. नेवासे शहरात जूनपासून झालेल्या पावसाच्या नोंदीत १५८ टक्के पाऊस झाला आहे. परिसरातील ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी ऑनलाइन तक्रार करावी, असे आवाहन कृषी डमाळे अधिकारी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...