आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शालेय शिक्षणाशी नाते तुटले

पारनेर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभारी कुलगुरू एन. एस. उमराणीकर यांची खंत, बहुगुण संपन्न विद्यार्थी घडवणे हे नवीन शैक्षणिक धोरण 2020 चे उद्दिष्ट

महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शालेय शिक्षणाशी असलेले नाते सद्यस्थितीत तुटले आहे, अशी खंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणीकर यांनी व्यक्त केली.

पारनेर महाविद्यालयात आयोजित ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील कार्यशाळेत डॉ. उमराणीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार नंदकुमार झावरे होते. विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य दिलीप ठुबे, उपस्थित होते. डॉ.उमराणीकर म्हणाले, बहुगुण संपन्न विद्यार्थी घडवणे नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी या धोरणाचा बारकाईने अभ्यास करायला हवा. नवीन शैक्षणिक धोरणाचे वाचन मुळापासून करायला हवे. कारण शालेय शिक्षण विषयक धोरणाचा अभ्यास असेल तरच आपण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील शिक्षण कसे असावे हे ठरवू शकतो. विद्यार्थी कसा घडवायचा याचा आराखडा पक्का असेल तर त्यांना आपण घडवू शकतो. त्यासाठी महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे शालेय शिक्षणाशी भक्कम नाते असणे आवश्यक आहे.मात्र सद्यस्थितीत नाते तुटले आहे. हे नाते पुन्हा जोडणे आवश्यक असल्याचे डॉ.उमराणीकर म्हणाले.

पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञानशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. चासकर म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात मुक्त शिक्षणाला महत्त्व दिले आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणाचे स्वातंत्र्य दिले आहे. विज्ञान शाखेचा विद्यार्थी कला शाखेतील विषय घेऊ शकतो.कला शाखेतील विद्यार्थी वाणिज्य शाखेतील एखादा विषय अभ्यासासाठी घेऊ शकतो. ही लवचिकता आणि शिक्षण स्वातंत्र्य या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिले असल्याचे डॉ.चासकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...