आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्य अत्यंत चुकीचे व निषेधार्थ:आ. प्रशांत बंब यांची भूमिका अयोग्य ;आमदार सुधीर तांबे

संगमनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत, तरी देखील घरभाडे व भत्ता घेतात. हे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे व निषेधार्थ असल्याचे मत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. या संदर्भात आमदार डॉ. तांबे म्हणाले, घरभाडे व भत्ता सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिला जातो. त्यामुळे शिक्षक मुख्यालयास राहत नाही म्हणून त्यांना घरभाडे भत्ता देऊ नये, ही चुकीची भूमिका आहे.

सध्या शासनाचे शिक्षकांकडे दुर्लक्ष आहे. हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षकांचा कार्यभार वाढला आहे. अनेक शैक्षणिक कामे त्यांना करावी लागतात. शालेय पोषण आहार, निवडणुका, सर्वेक्षणे आदी कामे पार पडून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम ते करतात. मुख्यालयाला राहण्याचा आग्रह चुकीचा आहे. वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मुख्यालयात रहावे, हा दुराग्रह अनावश्यक आहे. शिक्षकांनी स्वखर्चाने शाळेच्या इमारती रंगवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...