आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध ; भूमिपूजनप्रसंगी सुनीता गडाख यांचे प्रतिपादन

सोनईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही रस्ते विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू, असे आवाहन नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी केले.

नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथे विविध विकासकांमाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आयोजित कार्यक्रमात गडाख बोलत होत्या. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या विशेष प्रयत्नाने, जिल्हा परिषद सदस्या सविता अडसुरे यांच्यामार्फत महालक्ष्मीहिवरे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व उद्घाटन माजी सुनीता गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये महालक्ष्मी हिवरे ते मिरी रस्ता डांबरीकरण करणे.

कामाचे लोकार्पण, महालक्ष्मी हिवरे गावठाण अंगणवाडी बांधकाम, कामाचे लोकार्पण, महालक्ष्मी हिवरे ते मिरी रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, महालक्ष्मी हिवरे ते मिरीरस्तावर सीडी वर्क बांधकाम कामाचे भूमिपूजन, स्मशानभूमी विकास कामाचे लोकार्पण आदी कामांचा समावेश आहे. याप्रसंगी माजी सभापती कारभारी जावळे, माजी पंचायत समिती सदस्य अनिलराव अडसुरे, दादासाहेब एडके, भगवानराव गंगावणे, एकनाथराव जगताप, राजेंद्र गायके, सिमोन जाधव, अण्णासाहेब केदार, आश्रू सानप, राजेंद्र पालवे, रावसाहेब गायके, शरद बोरुडे, गोरख गायके, सोमनाथ पालवे, रंगनाथ पालवे, बाळासाहेब गायके, मल्हारी सांगळे, उद्धव सानप, अशोक केदार, भारत पालवे, बंडू पालवे, मंजाबापू भालेराव, रावसाहेब दहातोंडे, अशोक वाघमोडे, गोकुळ लोंढे, सुभाष गाढे, महादेव भानगुडे, अशोक बोरुडे उपस्थित होते. सर्व नागरिकांनी यावेळी मंत्री शंकरराव गडाख व माजी सभापती सुनीता गडाख यांचे आभार मानले.