आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Compared To The Country, 90 Percent Of Vegetables And Fruits Are Exported From Maharashtra, According To The Information Of The State Agriculture Commissioner

देशाच्या तुलनेत 90 टक्के भाजीपाला, फळांची राज्यातून निर्यात:'माझा एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांत कृषी आयुक्तांचा संवाद

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत कृषिप्रधान देश असून, देशातून निर्यात होणार्‍या भाजीपाला, फळांपैकी एकूण 90 टक्के निर्यात एकट्या महाराष्ट्रातून होते. शेतकर्‍यांचे यामध्ये मोठे योगदान आहे. शेतकर्‍यांना मानसन्मान मिळायलाच पाहिजे. तो शेतकर्‍यांचा हक्क आहे. शेतकर्‍यांमुळेच राज्याचा नावलौकिक झाला आहे. शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत धिरजकुमार यांनी किन्ही (ता. पारनेर) गावातील शेतकर्‍यांशी गुरुवारी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी (पुणे), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, जि. प. कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, सरपंच पूजा खोडदे, उपसरपंच हरेराम खोडदे, सीताराम देठे, पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणातील अधिकारी, कर्मचारी, तसेच शेतकरी उपस्थित होते.

धीरजकुमार पुढे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनात सर्व कारखानदारी बंद होती. परंतु शेती उद्योग अविरत चालू होता. कष्टकरी, शेतकरी शेतात राबून अन्नधान्य पुरवण्याचे काम करीत होता. या पुढील काळात गाव, समाज व शेती विकासासाठी सर्वांनी एकत्र राहायला हवे. स्मार्ट योजनेंतर्गत कृषी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी एक मोठी योजना आहे. यात 200 ते 250 शेतकरी एकत्रित आले. कंपनी स्थापन होऊ शकते. त्यासाठी शासनाचे अनुदान आहे. या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शेतकरी करू शकतो. यामुळे गावचा विकास होऊन देशाचा विकास होईल. देशाचा विकास हा खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले, ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत राबवला जाईल. याची सुरुवात नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील किन्ही गावापासून झाली. राज्यातील शेतकर्‍यांना येणार्‍या अडीअडचणी सोडवण्यासाठी हा उपक्रम सत्तार यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. ही योजना स्तुत्य असून, या माध्यमातून शेतकर्‍यांच्या अडचणी दूर होतील. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी गाव पातळीवर जाऊन कॅम्प घेऊन गावातील अडीअडचणी व प्रश्न सोडवावेत, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी गावकरी व शेतकर्‍यांशी चर्चा करताना गावकर्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित अधिकारी व शासकीय यंत्रणेला तक्रारींचे निराकरण तातडीने करण्याचे आदेश भोसले यांनी दिले. यावेळी नाईकवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. धीरजकुमार यांनी उद्यान पंडित शेतकरी राहुल रसाळ यांच्या शेताला क्षेत्र भेट देऊन चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...