आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:गाळपाअभावी राहणाऱ्या उसाला एकरी एक लाखाची नुकसान भरपाई द्यावी, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांची मागणी

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दोन साखर व इथेनॉल कारखान्यांमध्ये २५ किलोमीटर हवाई अंतराची अट लावल्याने शेतकऱ्यांना नवीन साखर कारखाने काढता आले नाहीत. परिणामी सन २०२१-२२ च्या हंगामात गाळपाअभावी ऊस शिल्लक राहणार आहे. याची जबाबदारी स्वीकारून आपत्ती निवारण कायद्यान्वये शिल्लक उसासाठी प्रतिएकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली.

सन २०१३ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या काळात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ऊस आंदोलन केले. पृथ्वीराज चव्हाण सरकारने शेतकऱ्यांवर गोळीबार केला.सांगली जिल्ह्यातील चंद्रकांत नलावडे आणि पुण्यातील कुंडलिक कोकाटे हे तरुण शेतकरी गोळीबारात मृत्युमुखी पडले. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन साखर धंद्यातील अकार्यक्षमता, अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग सरकारने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांची समिती नेमली.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या समवेत डॉ. सी. रंगराजन यांनी दिल्ली, कानपूर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता येथे बैठका घेतल्या. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाकावी, साखर कारखान्याच्या महसुली उत्पन्नातील ७० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना उसाचा भाव म्हणून देण्यात यावा, अशा महत्त्वपूर्ण शिफारसी डॉ. सी. रंगराजन समितीने केल्या. दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय भ्रष्ट साखर सम्राटांनी या शिफारशींची अंमलबजावणी होऊ दिली नाही. शेतकऱ्यांनी एकरी १०० टनांपर्यंत ऊस उत्पादनाचे लक्ष गाठल्याने ऊस उत्पादनात प्रचंड वाढ झाली.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सरकारने नवीन साखर आणि इथेनॉल कारखाने उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट घातल्याने मागील १० वर्षांत नवीन साखर कारखाने उभारले नाहीत. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या आपत्तीची जबाबदारी उद्धव ठाकरे सरकारची आहे. तेंव्हा आपत्ती निवारण कायद्याचा वापर करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...