आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील बाल कलाकरांना घडवण्यासाठी गेली २५ वर्ष कांकरिया करंडक हा उपक्रम राबवत आहे. यातून हजारो कलावंत घडत गेले, मी कांकरिया करंडकाचे हार्दिक अभिनंदन करते. सध्याची पिढी खूप धिट आहे. या मुखवट्यांच्या जगात तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता. स्वतःशी स्पर्धा करा, यश, अपयश तितक्याच सहजपणे स्वीकारा. भविष्याचे स्वप्न घडवण्यासाठी कांकरिया करंडक सारख्या व्यासपीठाची गरज आहे, असे मत सिने अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांनी केले.
कांकरिया करंडकच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या पारितोषिक वितरण त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे हे होते. याप्रसंगी अमोल खोले, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, स्वागताध्यक्ष डॉ. सुधा कांकरिया, सचिव सदाशिव मोहिते, किरण कांकरिया, परिक्षक सागर लोधी (पुणे) मिरा शेंडगे (सोलापूर) संजय पेंडसे (कोल्हापूर) लेखक परिक्षक सदानंद भणगे उपस्थित होते.
डॉ. प्रकाश कांकरिया यांनी कांकरिया करंडक बालगोपाळांसाठी वरदान ठरत आहे असे सांगुन मान्यवरांचे स्वागत केले, स्वागताध्यक्ष डॉ. सुधा कांकरिया यांनी कांकरिया करंडकचा २५ वर्षाचा इतिहास मांडला व भविष्यकालीन योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन व निकाल वाचन गौरी जोशी यांनी तर परिक्षकांचा परिचय डॉ. विजय जोशी यांनी तर आभार दत्ता इंगळे यांनी मानले. कांकरिया करंडक रौप्यमहोत्सवी वर्ष यशस्वी करण्यासाठी सदाशिव मोहिते, किरण कांकरिया, रमेश छाजेड, उमाकांत जांभळे, दत्ता इंगळे, शशिकांत नजान, नंदकुमार देशपांडे, सुभाष बागूल, मनोहर कटके, पुरूषोत्तम दरबस्तवार, डॉ. सुभाष बागले, प्रिया सोनटक्के, नंदकुमार देशपांडे, गाणपतराव लोखंडे, दीपक शिरसूल रामदास केदार यांनी परीश्रम घेतले.
निकाल पुढील प्रमाणे : एकांकिका प्रथम- अजब लोठ्यांची महान गोष्ट, सप्तरंग थिएटर्स, द्वितीय- एक रात्र गडावर, नाट्य अराधना, अहमदनगर, तृतीय- नापास, आनंद एज्युकेशन सोसा. पुणे. सर्वोत्कृष्ट लेखन-आनंद खरबस, दिग्दर्शन प्रथम आरती अकोलकर (सप्तरंग), द्वितीय अनंत जोशी (नाट्यअराधना) तृतीय नरेश डोंगरवाल (पुणे). अभिनय पुरूष, प्रथम- साहिर झावरे, द्वितीय- शर्व दाते, तृतीय- कैवल्य चांदवले. स्त्री अभिनय, प्रथम- गायत्री लोहकर, द्वितीय- अनन्या जोशी, तृतीय- अंतरा पाटील. संगीत, प्रथम- शैलेश देशमुख, द्वितीय- संजय सुर्यवंशी. नेपथ्थ, प्रथम- लक्ष्मीकांत देशमुख, द्वितीय- अमोल बंटी, शेव्ता अंबिकर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.