आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन केंद्र:शिर्डी मतदारसंघात युवकांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र ; आमदार राधाकृष्ण विखे यांची माहिती

लोणी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील सामान्‍य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सुरु केलेल्या प्रत्‍येक योजनेची अंमलबजावणी ही खऱ्या अर्थाने नव्या भारताच्या विकासाचे पडलेले पाऊल आहे. केंद्र सरकारच्या योजनांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरु करण्यात आलेले सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व हे सेवापर्व ठरावे, अशी भावना आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. आमदार विखे यांच्या हस्ते राहाता तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी सुरु केलेल्या योजनेच्या नोंदणीचा शुभारंभ प्रातिनिधीक स्वरुपात लोणी येथे करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाच्यावतीने कामगारांसाठी सुरु केलेल्या अटल विश्‍वकर्मा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण आमदार विखे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, उपाध्यक्ष अशोक पवार, प्रांताधिकारी गोंविंद शिंदे, तहसिलदार कुदंन हिरे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, तान्‍हाजी धसाळ, सभापती नंदा तांबे, वंतराव देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विखे म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदार संघ सर्व लाभांच्या योजनांमध्‍ये आणि विकास कामामध्ये अग्रेसर आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कालच देशातील युवकांना लष्करामध्ये नोकरीच्या संधी देण्यासाठी अग्निपथ योजना जाहीर केली. लष्कराच्या तीनही दलात ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या संधी आता मिळणार आहेत. या दृष्टीने युवकांना मार्गदर्शन होण्यासाठी शिर्डी मतदार संघात आता अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षा आणि नोकरीसाठी आवश्यक असे मार्गदर्शन करण्‍यासाठी केंद्र सुरु करत त्यांनी जाहीर केले. लोणी बुद्रूक गावचे ग्रामदैवत म्‍हसोबा महाराज यांना आमदार विखे पाटील यांनी सपत्नीक अभिषेक केला. यावेळी रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, शालेय साहित्याचे वाटप या निमित्ताने करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...