आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणतः खून, दरोडे तसेच जातीय वादातून दंगली होत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या, घरफोडी तसेच चैन स्नॅचिंगसारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. पोलिस यंत्रणेचा गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही. वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार आमदार संग्राम जगताप यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नगर शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यातून ग्राहक येथे खरेदीसाठी येतात. शहरात वारंवार गैरप्रकार होत असल्यामुळे जातीय तणाव निर्माण होतो. त्याचा परिणाम थेट बाजारपेठ तसेच व्यापारी वर्गावर होतो. त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. आठ ते दहा दिवस बाजारपेठ बंद ठेवावी लागते. सर्व व्यवहार ठप्प होतात. राज्यभर शहराची बदनामी होते. याची दखल घेऊन नगर शहरासह जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.