आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीनिहाय जनगनना:ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी जातीनिहाय जनगनना करा

राहुरी5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण ठिकविण्यासाठी जातीनिहाय जनगनना करावी. ही मागणी करत ओबीसी समितीच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी म्हटले शासनाने ओबीसी समाजाची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केले आहे.या आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित असलेली ओबीसींची आर्थिक, सामाजिक परिस्थितीची माहिती संकलन होणे अपेक्षित आहे.माञ आयोग सॉफ्टवेअर द्वारे आडनावा नुसार माहिती संकलित करीत आहे. ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे.

आयोगा मार्फत चुकीच्या पद्धतीने होणारे कामकाज थांबवण्यात यावे. तलाठी, ग्रामसेवकामार्फत माहिती संकलित करून शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात ठेवण्यात यावी. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...