आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधीच्या लाभाचे आवाहन:शनिवारी राष्ट्रवादी युवक कार्यकारणीसाठी मुलाखतीचे आयोजन

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नूतन कार्यकारणी नियुक्तीसाठी शनिवारी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदित युवकांना संधी देण्यासाठी व त्यांना पक्षाला जोडून घेण्याच्या उद्देशाने शहर युवकच्या कार्यकारणीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता नवलेनगर, गुलमोहर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयात मुलाखती होणार असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...