आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन:राजकीय अस्थिरतेमुळे झेडपीचा पीआरसी दौऱ्याबाबत संभ्रम; दौरा रद्द झाल्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त नाही

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या २०१६ ते २०१८ या कालावधीतील लेखा परीक्षा व पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या परिच्छेदांची साक्ष तसेच पंचायत समित्यांचा दौऱ्यासाठी पंचायती राज समितीचा (पीआरसी) २८ ते ३० जून या कालावधीत अहमदनगर दौरा निश्चित आहे. परंतु, सरकारमधील राजकीय अस्थिरतेमुळे या दौऱ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

पंचायत राज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांच्यासह ३२ विधानसभा सदस्यांची समिती अहमदनगर दौऱ्यावर येणार आहे. ३० मे रोजी आलेल्या पत्रानुसार ही समिती २३ ते २५ जून या कालावधीत येणार होती. त्यानंतर हा दौरा पुढे ढकलून २८ ते २५ जून या कालावधीत आयोजित करण्यात आल्याचे पत्र राज्याचे उपसचिव विलास आठवले यांनी ९ जूनला दिले. या दौऱ्यात २८ जूनला अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा, विधानपरिषद सदस्य, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांशी ही समिती चर्चा करणार आहे.

तसेच २०१६-२०१७ व २०१७-२०१८ या कालावधीतील लेखा परीक्षा पनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधांतील परिच्छेदाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवणार आहे. २९ जूनला भेट देण्यासाठी पंचायत समित्यांची यादी निश्चित करणार आहे. त्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा ग्रामपंचायत भेटी, गटविकास अधिकाऱ्यांशी संबंधित प्रश्नावलीबाबतही साक्ष होणार आहे. दरम्यान, शिवसेनेत पडलेली फूट व राजकीय अस्थिरतेमुळे हा दौरा होईल का ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अद्याप दौरा रद्द झाल्याबाबत कोणतेही पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त नाही. त्यामुळे जिल्हा परिषद स्तरावरील समितीच्या व्यवस्थेचे नियोजन थंड बस्त्यात आहे.

हॉटेल बुकिंगची प्रक्रिया थंडावली
पंचायत राज समितीसाठी किमान ५० रूमची व्यवस्था आवश्यक आहे. शासकीय विश्रामगृहाकडे एवढे सुट उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेने हॉटेलकडून बुकिंगसाठी निविदा मागवल्या होत्या. तीन निविदा प्राप्त झाल्या असल्या, तरी या टेंडर मंजुरीबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रशासन संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.