आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगर तालुक्यातील गट - गण रचना जाहीर करण्यात आली आहे. पण काही दिवसांपूर्वीच नागरदेवळे नगर परिषदेची अधिसूचना निघाली असताना, त्यातील समाविष्ट गावांसह गट- गण रचना जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे रचना अशीच राहणार की नगर परिषदेतील गावे वगळून पुन्हा नवी रचना होणार याबाबत तालुक्यातील संभ्रम कायम आहे.
नगर तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गट आणि १४ पंचायत समिती गणांची प्रारूप रचना आज जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये देहरे ( देहरे व पिंपळगाव माळवी) , जेऊर ( जेऊर व शेंडी), नागरदेवळे ( नागरदेवळे व बुऱ्हाणनगर ) , चिचोंडी पाटील ( चिचोंडी पाटील व केकती ) दरेवाडी ( दरेवाडी व अरणगाव), नवनागापूर( नवनागापूर व निंबळक ) वाळकी ( वाळकी व गुंडेगाव) असे ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणांची रचना करन्यात आली आहे. पूर्वीच्या गट - गण रचनेत मोठी उलथापालथ झाल्याचे नवीन गट गण रचनेवरून दिसून येत आहे.
नागर देवळे नगर परिषदेची अधिसूचना २१ मे ऐवजी राज्य शासनाने काढलेली आहे.त्या नगर परिषेमधील समाविष्ट नागरदेवळे, वडार वाडी, बाराबाभळी या गावांसह गट - गण रचना जाहीर झाल्याने तालुक्यातील राजकीय नेत्यांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेत गोंधळाचे वातावरण आहे. नवीन प्रारूप गट रचनेवर 2 ते 8 जून पर्यंत हरकत नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली असून २२ जून ला त्यावर सुनावणी होऊन २७ जून ला अंतिम गट- गण रचना जाहीर करण्यात येणार आहे. प्रारूप स्वरूपात जाहीर झालेल्या रचनेत देहरे गटात पिंपळगाव माळवी आणि देहरे असे पंचायत समिती गण दाखविण्यात आले आहेत. पण पिंपळगाव माळवी हे गाव मात्र पिंपळगाव माळवी गणात नसून त्याचा समावेश देहरे गणात दाखवला आहे . तसेच रांजणी- माथनी, आगडगाव - रतडगाव, दहिगाव- साकत, चास- कामरगाव, अकोळनेर - भोरवाडी अशी जुळ्या मानल्या जाणाऱ्या गावांची ताटातूट होऊन ते वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटात गेली आहेत. गट - गण रचना देहरे गट देहरे गण- देहरे, नांदगाव ( कोळपे आखाडा, घाणेगाव, सुजलपूर), शिंगवे ( इस्लामपूर), पिंपळगाव माळवी, मांजर सूंभा, पिंपरी घुमट पिंपळगाव माळवी गण- निमगाव वाघा, हमीदपूर, हिंगणगाव, जखन गाव, टाकळी, खातगाव, हिवरे बाजार, विळद, निमगाव घाना, कर्जुने खारे, जेऊर गट जेऊर गण- जेऊर,आव्हाडवाडी, इमामपूर, बहिरवाडी, मजले चिंचोली, खोसपुरी, पांगरमल, उदरमल, धनगर वाडी, डोंगरगण शेंडी गण- शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, खांडके, रांजनी, देवगाव, आगडगाव, ससेवाडी नागरदेवळे गट नागरदेवळे गण - नागरदेवळे , वडारवाडी बुऱ्हाणनगर गण - बुऱ्हाण नगर, वारूळ वाडी, कपूर वाडी, मेहकरी, बारदरी , रतडगाव, कौडगाव, माथनी ( जांब, बाळेवाडी) चिचोंडी पाटील गट चिचोंडी पाटील गण- चिचोंडी पाटील, शिराढोन, मांडवे, उक्कड गाव, नारायण डोहो, साकत, आठवड, सांडवे, टाकळी काझी, दशमी गव्हाण, केकती गण- केकती, बाराबाभळी, सारोळा बद्दी, निंबोडी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी, भातोडी, पारगाव, कोल्हेवाडी, मदड गाव, दरेवाडी गट दरेवाडी गण- दरेवाडी, दहिगाव, पारगाव मौला, वाळुंज, बाबूर्डी घुमट, वाकोडी अरणगाव गण- अरण गाव, खंडाळा, खडकी, सोनेवाडी, चास, बुरुडगाव, वाटेफळ नवनागापूर गट नवनागापूर गण- नवनागापूर ,वडगाव गुप्ता, इसळक निंबळक गण- निंबळक, नेप्ती, पिंपळगाव वाघा, भोयर पठार, भोयरे खुर्द, पिंपळगाव कौडा, कामरगाव, भोरवाडी वाळकी गट वाळकी गण- वाळकी, सारोळा कासार, बाबूर्डी बेंद, घोसपुरी, अकोळनेर, हिवरे झरे, जाधववाडी गुंडेगाव गण- गुंडेगाव, देऊळगाव सिद्धी, राळेगण, वडगाव, तांदळी, रुई, गुणवडी, अंबिलवाडी, मठपिंप्री , हातवळण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.