आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक शहर व जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून, शिंदे-फडणविस सरकारच्या युवा विरोधी निती युवक आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी. तसेच सर्वांना २० मार्चला मुंबई येथील घेराव आंदोलनात सहभागी करून घेण्याचे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले. अहमदनगर शहर व जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक राऊत यांच्या अध्यक्षतावाली शासकीय विश्रामगृह येथे झाली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, प्रदेश महासचिव दिपाली ससाणे, प्रदेश सचिव राहूल उगले, युवक सचिव योगेश काळे, सहसचिव सोमनाथ पाबले, शहर प्रभारी दिनेश चोथवे, सुनील नागरगोजे, अहमदनगर ग्रामिण जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, मोहसिन शेख आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्राची संघटनात्मक प्रगती, उद्भवणाऱ्या समस्या व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाकडून अपेक्षा यासह विविध विषयांवर चर्चा झाली.तसेच २० मार्चच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. शहरात आगामी डिसेंबर महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, त्यात ५० टक्के जागा, युवकांना मिळाव्यात, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आली. त्यावर राऊत यांनी मागणी मान्य करत युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.