आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कर्मवीरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद नगरमध्येही उमटले आहेत. शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरा एकत्र जमले होते. मंत्री पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाटील यांना काँग्रेस कार्यकर्ते त्यांना नगरमध्ये फिरू देणार नाहीत, असा इशारा यावेळी किरण काळे यांनी दिला.
यावेळी यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, फैयाज शेख, शम्स खान, प्रवीण गीते पाटील, अभिनय गायकवाड, अभिनय गायकवाड, साबीरभाई शेख, इमरान बागवान, जरीना पठाण, डॉ. जाहिदा शेख, मंगल भुजबळ, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषा भगत आदी उपस्थित होते. किरण काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले या दांपत्याने अत्यंत संघर्षातून शिक्षणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अमुलाग्र काम केले. अशा महापुरुषांबद्दल भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, असे काळे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.