आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्योजक अदानींच्या निषेधार्थ श्रीरामपूर येथील स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर साेमवारी (6 फेब्रुवारी) श्रीरामपूर तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक निदर्शने केली. यावेळी अदानी उद्योग समूह व भाजप सरकारचाही निषेध करण्यात आला.
हिंडनबर्गचा रिसर्चच्या अहवालानंतर अदानी उद्योग समूहाला ज्या अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे अवघ्या 10 दिवसांत या उद्योग समूहाचे 10 लाख कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाले. एका अर्थाने भारतीय भांडवलाचे नुकसान झाले आणि त्याला सर्वस्वी गौतम अदानी व त्यांच्या कंपन्यांनी केलेली आणि उघडकीस आलेली अफरातफरी कारणीभुत असल्याचा आरोप आमदार लहू कानडे यांनी केला.
यावेळी अरुण नाईक, अशोक कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, योगेश आसने, अस्लम शेख, कलीम कुरेशी, विष्णुपंत खंडागळे, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे, अक्षय नाईक, आनंदा साळवे, आशिष शिंदे, निखील कांबळे, प्रतीक कांबळे, आकाश शेंडे, जालिंदर बोर्डे, विलास दरेकर जालींदर बोर्डे, विलास दरेकर, रामा पांढरे, जमीर पिंजारी, अक्षय खंडागळे आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
केंद्रातील भाजपच्या सरकारचे उद्योगपती अदानी हे मित्र असल्याचे जगजाहीर आहे. केवळ त्यांच्या घनिष्ठ संबंधामुळेच भारतातील राष्ट्रीयकृत बँकांनी आणि महत्वाच्या वित्त संस्था असणाऱ्या आयुर्विमा महामंडळानी अदानी उद्योग समूहाला लाखो कोटींचे कर्ज दिले. अदानी उद्योग समुहाच्या कंपन्या केव्हाही दिवाळखोरीत जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने बँकांनी केलेला वित्तपुरवठा धोक्यात आला आहे. तसेच एलआयसीने केलेली गुंतवणुक संकटात सापडली आहे.
दबावाला बळी पडून कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांना त्यांच्या चुकीच्या कृतीची जाणीव करून देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने या वित्तीय संस्थांच्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर आंदोलन केले जात आहे. याचाच भाग म्हणून व स्टेट बँक व एलआयसीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच अदानी उद्योग समूह व भाजप सरकारचाही निषेध करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.