आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भकासपर्व​​​​​​​:काँग्रेस मांडणार आठ वर्षांतील शहराच्या दुर्दशेचे भकासपर्व​​​​​​​ ; एमआयडीसीच्या दुरावस्थेमुळे शहरात तरुणांत बेरोजगारी

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या वतीने मागील ८ वर्षांतील शहराच्या दुर्दशेचे भकासपर्व मांडणार असून, लवकरच तसे पुस्तकही प्रकाशीत करण्यात येणार आहे, अशी घोषणा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली. हे पुस्तक डिजिटल स्वरूपात असणार आहे. नगरकरांच्या प्रतिक्रियांसह असणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काळे म्हणाले, नगर एमआयडीसीच्या दुरावस्थेमुळे शहरात तरुणांत बेरोजगारी, राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या शहराच्या लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे विस्कळीत झालेली बाजारपेठ, खड्ड्यांत हरवलेले रस्ते, शहराच्या अनेक भागांत स्ट्रीटलाईट अभावी पसरलेला अंधार, अनेक भागांत आजही आठ, दिवस नळाला न येणारे पिण्याचे पाणी, अशा नागरी समस्यांमुळे नगरकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे. नगरकरांच्या समस्यांवर काँग्रेसचे हे पुस्तक प्रकाश टाकणार आहे. शहराच्या नागरी, सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठवणारा विरोधी पक्षनेता मनपाला राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षाचाच नगरसेवक विरोधी पक्षनेता असणारी नगर ही देशातली एकमेव मनपा आहे. काँग्रेसची बांधिलकी ही सामान्य नगरकरांच्या प्रति आहे. काँग्रेस हाच सर्वसामान्यांच्या मनातला विरोधी पक्षनेता असल्याचे म्हणत पुस्तकाच्या माध्यमातून शहर दुर्दशेचे वास्तव मांडणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...