आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य धोक्यात:22 गावांतील नागरिक पिताहेत दूषित पाणी; जिल्हा आरोग्य यंत्रणेचा अहवालातून झाले उघड, ग्रामपंचायतींना पाठवले पत्र

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका तसेच जिल्हा स्तरावरील प्रयोग शाळेत ९४१ जलस्त्रोतांच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले असता २२ गावांतील २४ नमुणे दूषित आढळून आले आहेत. संबंधित ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पत्र पाठवून टीसीएल पावडरचा वापर करण्याची सूचना दिली आहे.

जलजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरच जलसुरक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या स्त्रोताचे ९४१ नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात पारनेर तालुक्यातील १५, पाथर्डी ६, नगर १, संगमनेर तालुक्यातील २ ठिकाणचे नमुने दूषित आढळून आले. दूषित पाण्यावर ठोस उपाय योजना होत नसल्याने या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दूषित पाण्याचा धोका काय ?
दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराचा धोका संभवतो, त्यात टाईफाईड, जुलाब, उलट्या, कावीळ आदी आजारांचा समावेश आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण करण्याचे आदेश आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला दिले.

५०० दूषित ठिकाणे झाली शुद्ध
१ एप्रिल २०२१ ते आतापर्यंत जिल्ह्यात १३ हजार २६९ जलनमुने तपासले. त्यात ५३१ नमुने दूषित आढळून आले होते. बॅक्टेरिया नष्ट करणाऱ्या टिसीएल पावडरचा प्रभावी वापर केल्याने सद्यस्थितीत २४ नमुने दूषित आढळले.

आजाराची साथ नाही
दूषित पाण्यामुळे टाईफाईड, जुलाब, उलट्या, कावीळ यापैकी कोणत्याही आजाराची साथ वर्षभरात आली नाही. दूषित नमुने आढळलेल्या ग्रामपंचायतींना उपाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

या गावांत दूषित पाणी
उक्कडगाव (नगर), काकडी, टाकळी (कर्जत), रांजणगाव, अस्तगाव, पिंपरी गवळी, लोणी हवेली, सुपा, अळकुटी, गारखिंडी, पाडळी आळे, लोणीमावळा, रांधा (पारनेर), येळी, पत्र्याचा तांडा, प्रभुपिंपरी, जांभळी, निवडुंगे, चितळी (पाथर्डी), निंबाळे, कुरण (संगमनेर).

बातम्या आणखी आहेत...