आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकार:पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनात दूषित पाणी; नगरपालिकेने पाणी घेण्यास दिला नकार

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारदरा धरणातून पिण्यासाठी सोडलेल्या आवर्तनात मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी आले आहे. त्यामुळे पाणी योजनांवर संकट ओढवले असून नगरपालिका व ग्रामपंचायतीने पाणी घेण्यास नकार दिला आहे. यापूर्वीच दैनिक दिव्यमराठीनेही कालव्यात सांडपाणी येत असल्याबद्दल प्रकाशझोत टाकला होता. लाभक्षेत्रातील श्रीरामपूर शहर तसेच ग्रामीण भागातील पाणी योजनांसाठी हे आवर्तन महत्वाचे आहे. श्रीरामपूर पालिकेच्या दोन्ही साठवण तलावांना ८२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.

बेलापूर ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेला आवर्तनातून पाणी घेण्यात येणार आहे. मात्र सोमवारी सोडलेले पाणी दूषित असल्याचे बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या लक्षात आले. नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांनाही त्याबाबत सूचना देण्यात आली. ओझर येथील बंधार्यामध्ये साठविलेले हे पाणी होते. अर्धा टीएमसीहून अधिक असलेल्या या पाण्यावर हिरवा रंग होता. त्यामुळे पिण्यासाठी ते घातक ठरले असते. पालिकेचे अभियंता तसेच सरपंच व उपसरपंच यांनी पाणी स्वीकारण्यास नकार दिला.

त्यांनी वडाळा पाटबंधारे विभागाकडे हरकत नोंदविली. अखेर साठवण तलावांऐवजी पाणी खाली कालव्यांना सोडले गेले.आवर्तन केवळ पिण्यासाठी असून उर्वरित कालावधीत साठवण तलाव भरून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. नेमके कोणत्या स्त्रोतांमुळे पाणी दूषित झाले आहे, याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत आहे, तसेच असा प्रकार प्रथमच घडल्याचे नान्नोर यांनी सांगितले. पर्यावरण विभागाकडे आम्ही तक्रार करू, असेही ते म्हणाले.

स्वच्छ पाण्यानेच तलाव भरावा
निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र ओझर बंधार्यातील साचलेले पाणी कालव्यात आले. पिण्यासाठी ते अत्यंत घातक आहे.ते आम्ही तलावात घेणार नाही. स्वच्छ पाण्याने ग्रामपंचायत तलाव भरेपर्यंत आवर्तन बंद करू नये.''-अभिषेक खंडागळे, उपसरपंच बेलापूर.

धरणातील पाणी सोडा
नगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाची मागणी केली होती.त्यावर पाटबंधारे विभागाने ओझर बंधाऱ्यात साठवलेले पाणी सोडले अशी माहिती मिळाली असून ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने तलावात घेतले नाही.त्यासाठी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली असून पाटबंधारे विभागाने त्यास संमती दाखवली आहे.-गणेश शिंदे, मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपालिका.

बातम्या आणखी आहेत...