आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअविरत अभ्यास व चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन श्रीगोंदे नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदे संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात इयत्ता दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस होते. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, मनोहर पोटे, लेफ्टनंट हिंगसे, जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, बाजीराव कोरडे, प्राचार्या गीता चौधरी, लाइफवर्कर शहाजी मखरे, राजेंद्र खेडकर, सुदाम वाघमारे, मुकुंद सोनटक्के, रवी दंडनाईक, हरिश्चंद्र नलगे,पीटर रणसिंग तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक मंचावर उपस्थित होते.
मुख्याधिकारी देवरे यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक क्लुप्त्या विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितल्या. यावेळी दहावीत ९८.२० गुण मिळवून तालुक्यात प्रथम आलेला विद्यार्थी तन्मय दरेकर याने विद्यालय व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सूतोवाच मनोहर पोटे केले. दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थी, पालक, व कलाशिक्षक संतोष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी, सूत्रसंचालन विलास लबडे यांनी, तर आभार पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे यांनी मानले.
अपयशाने खचून न जाता ध्येयाची शिखरे पादाक्रांत करावी मी महादजी शिंदे विद्यालयाचा विद्यार्थी आहे, अविरत कष्ट व अभ्यासातील सातत्य तसेच अपयशाने खचून न जाता ध्येयाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत हेच खऱ्या अर्थाने ही यशाचे गमक आहे, असे शाळेचे माजी विद्यार्थी तथा लेफ्टनंट हिंगसे यावेळी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.