आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांनी आपल्या परिसराची व देशाची गरज ओळखून आपल्या मनातील नव कल्पनांना मूर्त रूप देऊन उद्योगाची उभारणी केल्यास निश्चितच उद्योगाची भरभराट होऊन देशसेवेसाठी त्यांचा हातभार लागेल, असे प्रतिपादन आधार महिला केंद्राच्या अध्यक्ष सुप्रिया मंडलिक यांनी केले.
न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर येथे आयोजित पर्यावरण पूरक पिशव्या निर्मितीच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. महाविद्यालयात गुणवत्ता हमी कक्ष तसेच इनोव्हेशन व स्टार्टअप सेलच्या वतीने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रद्दी पेपरपासून आकर्षक व पर्यावरणपूरक पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
यावेळी सुप्रिया मंडलिक म्हणाल्या, पुणे, मुंबईसारख्या महानगरात वर्तमानपत्रापासून बनवलेल्या आकर्षक पिशव्यांना चांगली मागणी असून त्याद्वारे विद्यार्थ्यांची उद्योग विद्यार्थी उद्योगाची निर्मिती करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांची पाच हजार पिशव्यांची मागणी नोंदविण्यात आल्याचे सांगून कमवा व शिका या योजनेतून मोठ्या प्रमाणावर आकर्षक पिशव्या बनवणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. विजयकुमार राऊत यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, कला शाखा प्रमुख प्रा. डॉ. दीपक सोनटक्के, प्रा. डॉ. भूषण भालेराव, प्रा. डॉ. भाऊसाहेब शेळके, प्रा. अशोक मोरे, प्रा. डॉ. हनुमंत गायकवाड आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा. शिवाजी पठारे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.