आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:पतीच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण करून पर्यावरणाला हातभार; संघटना आणि मुख्याधिकाऱ्यांकडून कौतूक

कर्जत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृक्षारोपण करून पतीच्या स्मृती जपन्यासाठी एका पत्नीने आणि मुलाने घेतलेला निर्णय भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणारा ठरेल, असे प्रतिपादन कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले.

९ मे रोजी कर्जत येथील कै. धनराज परहर यांचा जन्मदिन असल्याचे औचित्त साधून त्यांच्या पत्नी सारिका परहर आणि मुलगा हर्षवर्धन यांनी वृक्षारोपण करून आणि त्या वृक्षाचे संगोपन करण्याचा मानस कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमींकडे व्यक्त केला. कर्जत येथील नागेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण संरक्षक जाळी लावून नावाची पाटी लावून करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी जाधव बोलत होते. यावेळी सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल आणि सर्व सामाजिक संघटनेचे पुरुष आणि महिला श्रमप्रेमी उपस्थित होते.

यावेळी सारिका परहर म्हणाल्या, कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगर पंचायत गेल्या ५८४ दिवसांपासून कर्जत आणि परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे काम करीत आहे. मी ही सहा महिन्यांपासून या अभियानात सक्रिय झाले. लेकींचे झाड ही संकल्पना पुढे आली आणि मोठ्या प्रमाणावर त्यास प्रतिसाद मिळाला.

काही वर्षापूर्वी पतीचे आजाराने निधन झाले, त्यांचा जन्मदिवस आणि स्मृतीदिन आम्ही साजरा करतो. परंतु या अभियानात काम करताना पतीच्या स्मृती जागवण्यासाठी वृक्षारोपण करून साजरा करण्याची संकल्पना सुचली आणि वृक्षरोपणाने ते साजरे केले. असे सांगून त्यांनी ज्यांचे कोणाचे निधन झाले आहे, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...