आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कोरोना काळात आशा सेविकांचे योगदान अनमोल तहसीलदार प्रशांत पाटील यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात आशा सेविकांनी जीवाची पर्वा न करता प्रत्यक्षात नागरिकांच्या दारोदारी जाऊन आरोग्य सेवा केली. त्यामुळे कोरोनावर मात करता आली. त्यामुळे आशा सेविकांचे योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले. श्रीरामपूर नगरपालिकेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित आशा दिवस प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस, माजी सभापती वंदना मुरकुटे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मोहन शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. गिडवानी, रोटरी क्लबचे डॉक्टर्स, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री देशमुख आदी उपस्थित होते. याप्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविका व आशा गटप्रवर्तक यांचा सन्मान करण्यात आला. आशासाठी आरोग्य तपासणी, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचे प्रशिक्षण तसेच कला व नाट्यस्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका समूह संघटक कविता जगताप, गटप्रवर्तक अलका कुताळ, रत्नमाला नागले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आशा सेविका उपस्थित होत्या.

यांना मिळाला पुरस्कार
शबाना आरिफ शेख, निर्मला चंद्रकांत कहांडळ, कल्पना पुंजाहरी दरेकर, उषा भागवत काळे, भारती दिलीप शेळके, प्रतिभा रघुजी वाघमारे, सविता भीमराज जगताप, अनुराधा सुरेश गड्डे, गटप्रवर्तक अलका कुताळ, रत्नमाला नागले यांना सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...