आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीवरून वाद:राधाकृष्ण विखे-पाटील व बाळासाहेब थोरात यांच्या गटात हाणामारी; 13 जणांवर गुन्हा

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात 195 गावांमध्ये उद्या मतदान होणार आहे. तसेच मतदान कर्मचारी - अधिकारी मतदान यंत्रासह अन्य साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान एकीकडे जिल्ह्यात ग्राम पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील मालुंज गावात निवडणुकीच्या किरकोळ कारणावरून विखे थोरात गटात हाणामारी झाली. याप्रकरणी माजी सरपंच ,तीन उमेदवारांसह 13 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील 8 ग्रामपंचायतीं बिनविरोध झाल्याने मतदानासाठी शनिवारी (17 डिसेंबरला) कर्मचारी व अधिकारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत.

नगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे रविवारी 18 डिसेंबरला ) उर्वरित 195 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 766 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी 4 हजार 115 कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 9 नोव्हेंबरला आचारसंहिता जारी झाली होती. शुक्रवार 16 नोव्हेंबरला या निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती संगमनेर तालुक्यातील असून, या तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत.

रविवारी होणाऱ्या मतदानासाठी अहमदनगरच्या सावेडी येथील तहसील कार्यालयांतून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, मतमोजणी यंत्रे व अन्य साहित्य घेऊन जाण्यासाठी शनिवारी कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी दुपारी बारा वाजता खाजगी वाहनांच्या रांगा तहसील कार्यालयाच्या बाहेर लागलेल्या होत्या. त्याचबरोबर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...