आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई:शिस्तबद्ध वातावरणात गणेशोत्सवाची परंपरा जपून पोलिस प्रशासनास सहकार्य करा ; भोर

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या २ वर्षाच्या काळात खंड पडलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा जल्लोषात साजरा होत असला तरी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपारिक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणात गणेशोत्सवाच्या परंपरा जपून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले. गणेशोत्सवानिमित्त राहुरीच्या पांडुरंग मंगल कार्यालयात मंडळाचे कार्यकर्ते,शांतता कमेटीचे सदस्य तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत मार्गदर्शन करताना स्वाती भोर म्हणाल्या दहा दिवसाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येणार आसुन उत्सवाच्या काळात रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

राहुरी शहरात विसर्जन मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या अडथळ्याबाबत गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या तक्रारी दूर करण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनास देण्यात आली आहे.विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपती नंतर क्रमवार गणेश मंडळ सहभागी राहण्याच्या दृष्टीने मंडळाची यादी जाहीर केली जाणार आहे.राहुरीचे मुळा नदीपात्र तसेच मुळा धरणाच्या पाञात गणेश विसर्जन होत असल्याने या ठिकाणी सुरक्षितता राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बैठकीस नायब तहसीलदार दळवी,पोलीस उपनिरीक्षक ,चारूदत्त खोंडे,उपनिरीक्षक ज्योती डोके, महावितरणचे गावले,राहुरी नगर परिषदेचे विलास घटकांबळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...