आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता समितीची बैठक:सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य : मुस्लिम बांधव

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कत्तलची रात्र मिरवणुकीत टेंभ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांकडून शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाला आमचे सहकार्य राहील, असे आश्वासनही यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले.

मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत विविध संघटना व यंग पार्ट्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, अजित पाटील, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, भिंगार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप आदी उपस्थित होते.

मागील काही वर्षांपासून मोहरम उत्सवांतर्गत रात्रीच्या वेळी काढल्या जाणाऱ्या कत्तलची रात्र मिरवणुकीमध्ये टेंभे पेटवून सवारी बरोबर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्यावेळी काही घटना घडल्या होत्या. आज तशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे मिरवणुकीमध्ये टेंभ्यांना पुन्हा परवानगी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल : अग्रवाल
टेंभ्यांना परवानगी का नाकारण्यात आली होती, बंदी का घालण्यात आली होती, याची माहिती घेतली जाईल. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल. मोहरम उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाच्या सूचनांचे व निर्बंधांचे पालन करून शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहनही अग्रवाल यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...