आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:ऑक्सिजन मशिन नादुरुस्त झाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्णास ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी लागणारे मशिन खरेदी केल्यानंतर ते एकाच दिवसात खराब झाले. ते पुन्हा दुरुस्त करून देण्यास टाळाटाळ केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित मशिन पुरवठा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध येथील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील व्यावसायिक रविराज सुरेश बेलदार (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक येथील वरद एन्टरप्राईजेसचे रुपेश मधुकर वरखडे (रा. पीएन्डटी कॉलनी, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

फिर्यादी बेलदार यांची आई लक्ष्मीबाई सुरेश बेलदार यांना कोविडची लागण झाल्याने ३० एप्रिल २०२१ रोजी उपचारासाठी येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल झाल्याने व ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी लागणारे मशिन हॉस्पिटलमध्ये नसल्याने सदर मशिन फिर्यादीला बाहेरून आणण्यास सांगितले. फिर्यादीने नाशिक येथील वरद एन्टरप्राईजेसकडून मशिन आणले. ते साईदीप हॉस्पिटल येथे आणण्यात आले. या मशिनद्वारे ५ मे २०२१ रोजी संध्याकाळपासून फिर्यादीच्या आईला ऑक्सिजन पुरवठा चाल केला. दुसऱ्याच दिवशी दुपारी मशिन बंद पडले. फिर्यादीने रुपेश वरखडे यांच्याशी संपर्क करून देखील त्याने ते मशिन दुरुस्त केले नाही. त्यामुळे फिर्यादीच्या आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी रुपेश वरखडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...