आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अहमदनगर:कोरोनाबाधित रुग्णाने मारली हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगरएका महिन्यापूर्वीलेखक: अनिरुद्ध देवचक्के
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णाने रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या या रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय रुग्ण पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर अनेक दिवसांपासून स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्याला अहमदनगर शहरातील सुरभी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास त्याने खिडकीची काच फोडून खाली उडी मारली. खाली पडून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने ही उडी पळून जाण्यासाठी मारली होती की आत्महत्या करण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तोफखाना पोलिसांना घटेनची माहिती देण्यात आली असून, चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.