आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब दिवस:कोरोनाने घट्ट केली कौटुंबिक नातेसंबंधातली वीण; आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अडीच वर्षांपूर्वी सर्वांच्या नकळत कोरोना महामारीने भारतात प्रवेश केला. हा हा म्हणता या विषाणूने व्यापक स्वरूप धारण केले अन् देश लॉकडाऊन झाला. या अडीच वर्षांच्या काळात माणसं घरात कोंडल्यामुळे एकीकडे काही घरात कौटुंबिक कलह वाढले. अनेक जोडप्यांचे वैवाहिक आयुष्यही तुटण्याच्या बेतात आले. तर दुसरीकडे याच महामारीमुळे काही कुटुंबं एकत्र आली. त्यामुळे एकोप्याचे महत्त्व पटले. मढी (ता. पाथर्डी) येथील मरकड कुटुंबीय हे याचेच उदाहरण.

९६ वर्षीय शंकरराव किसन मरकड, त्यांचे बंधू भाऊराव (वय ९२), एकनाथ (वय ९०) या तिघा भावंडांची मुले, सुना, नातवंडे आणि पतवंडे, अशा चार पिढ्यातील सुमारे ९० हून अधिक जण लॉकडाऊनमध्ये मढीत एकत्र आले. एरवी फक्त दिवाळसण व लग्नसमारंभनिमित्त काही दिवस एकत्र येणारे मरकड कुटुंबीय कोरोनामुळे कुठलेही विसंवाद किंवा कलह न होता हे कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र नांदले. अन् आज समाजाला एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व पटवून देणारे आदर्श ठरले आहेत.

शंकरराव, भाऊराव, एकनाथ व त्यांचे एक दिवंगत बंधू पूर्वापार शेतकरी. पण त्यांना शिक्षणाचे महत्व पटल्याने सर्वांनी आपापल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. पुढच्या पिढीतील तुकाराम, उत्तमराव, दिगंबर, सुरेंद्र, विष्णू, संभाजी, जनार्दन, दत्तात्रय, भाऊराव, अशोक, राजेंद्र ही चुलत भावंडं. यापैकी सहा जण शिक्षक, तर इतर डॉक्टर व इंजिनिअर. त्यांची मुलेही उच्चशिक्षित असून काही नोकरीला आहेत. या कुटुंबातील सदस्य नोकरीच्या व मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने औरंगाबाद, लातूर, हिंगोली, नगर, आदी ठिकाणी रहात आहेत.

कोरोनाकाळात एकत्र आल्यानंतर दुपार व रात्रीचे जेवण, जुन्या आठवणींना उजाळा, शेतातील कामे, या गोष्टी सर्वांनी एकत्रितच केल्या. लहानथोरांचे वाढदिवस साजरे केले. एकमेकांसोबत शेअरिंग वाढले. मोबाईल व टीव्हीपासून दूर राहात प्रत्यक्ष संवादाला प्राधान्या दिल्यामुळे लॉकडाऊन काळातही सर्वांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहिले.

बातम्या आणखी आहेत...