आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्र:नगरसेवक बागुल व कैलास जाधव कायमस्वरूपी अपात्र

कोपरगाव शहर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव नगरपरिषदेचे तत्कालीन उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना मारहाण करून कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात केलेल्या तोडफोड केल्याप्रकरणी दाखले केलेल्या गुन्ह्यावर निकाल देत माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व माजी नगरसेवक कैलास द्वारकानाथ जाधव यांना कायमस्वरूपी अपात्र घोषित केल्याचे निकाल जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला, अशी माहिती अॅड. विद्यासागर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना तत्कालीन मुख्याधिकारी डोईफोडे यांनी दिलेल्या आदेशाने व शासनाच्या नियमानुसार कोपरगाव शहरातील अतिक्रमणे नियमाप्रमाणे काढली होती. त्याचा राग धरून माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल व नगरसेवक कैलास जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालिका कार्यालयात उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. कोपरगाव नगरपरिषदेचे कार्यालयातील बांधकाम विभागाचे अभियंता दिगंबर वाघ यांना शिवीगाळ करत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली होती.

त्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी १९६५ चे कलम ४४ नुसार सुनील जनार्धन फंड व हेमंत यशवंत ढगे यांनी केलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून, सीसी टीव्ही फुटेज, फिर्यादीचे जबाब व मुख्याधिकारी यांचा गुप्त अहवाल यासर्वांची पडताळणी करून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल व नगरसेवक कैलास जाधव यांच्यावर झालेल्या आरोपांनुसार दोषी धरत कायमस्वरूपी अपात्र घोषित करण्यात आल्याचा अंतिम निकाल दिला. दरम्यान, या प्रकाराने कोपरगावात राजकीय खळबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...