आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त करण्याची मागणी:कापूस उत्पादक शेतकरी चोरट्यांमुळे झाले त्रस्त

कोपरगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डाऊच बुद्रुक परिसरात रात्रीतून शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या पांढऱ्या सोन्यावर अर्थात कपाशीवर भुरटे चोर डल्ला मारला. अवकाळी पावसातून वाचवलेल्या पिकांचा हाता तोंडी आलेला घास चोरीला जात असल्यामुळे शेतकऱी हवालदील झाले आहेत. या भुरट्या चोरांचा पोलिस स्टेशनने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

काल डाऊच बुद्रुक परिसरातील सर्वे नंबर १०३ मधील भिवराव मार्तंड दहे यांच्या शेतातील कपाशीच्या बोंडा मधून निघालेला कापूस रात्री भुरट्या चोरांनी वेचणी करत आपल्या सोबत घेऊन गेले. गणपत संपत दहे यांच्या शेतातील कापूस चोरट्यांनी लंपास केला. आज कपाशीला जवळपास नऊ ते दहा हजार रुपये क्विंटल इतका भाव आहे. रात्री दोन तीन तासांमध्ये साधारण एक माणूस ३० ते ४० किलो कापूस गोळा करु शकतो मात्र ही चोरी करताना साधारण दहा ते पंधरा चोर असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...