आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बोल्हेगावच्या रस्त्यासाठी नगरसेवक देणार राजीनामा ; मदन आढाव यांचा इशारा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्हेगाव रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार स्व. अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले होते. त्यांच्यासह नगरसेवकांनी या रस्त्याच्या कामासाठी जेलची हवा खाल्ली. अद्यापही बोल्हेगाव गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी मंदिर रस्त्याचे काम रखडलेले आहे. स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे महापालिका आयुक्त सांगत आहेत. मात्र, येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास मी नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा नगरसेवक मदन आढाव यांनी दिला आहे.

आढाव यांनी बाळासाहेबांची शिवसेनाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले यांच्यासमवेत मनपा आयुक्तांची भेट घेतली. यावेळी अमोल हुंबे, काका शेळके, चंद्रकांत उजागरे, अभिषेक भोसले, संजय छजलानी, रवींद्र लालबोंद्रे, सुनील लालबोंद्रे, प्रशांत डावरे, मुकेश जोशी, ओमकार जाधव, विशाल गायकवाड, सागर वाळके, लखन केसळकर, प्रेम शिंदे, अभिषेक गायकवाड, तुषार शिंदे ओमकार कांबळे, तारीक कुरेशी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...