आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी केंद्रावर पोलिस बंदोबस्त:जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमोजणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : उदय जोशी - Divya Marathi
छाया : उदय जोशी

नगर जिल्ह्यातील १९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी ८१ टक्के मतदान झाले. मंगळवारी (२० डिसेंबर) सर्व तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी सात वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी तेथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रथमच जनतेतून सरपंच पदाची निवड होणार असल्यामुळे, गावागावांमध्ये सध्या गावचा सरपंच कोण ? यावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.नगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींसाठी ९ नोव्हेंबरला निवडणुका जाहीर झाल्या होत्या.

सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील ३७ ,अकोले तालुक्यातील ११, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव २६, नगर २६, नेवासे १३, पारनेर १६, पाथर्डी ११, राहाता १२, शेवगाव १२, श्रीरामपूर ६, राहुरी ११ व श्रीगोंदे तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. २०३ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतीं बिनविरोध झाल्या होत्या.

उर्वरित १९५ ग्रामपंचायतीसाठी रविवारी ८१ टक्के मतदान झाले. मतमोजणी मंगळवारी (२० डिसेंबर) होणार आहे. १५ सरपंचांच्या निवडी देखील बिनविरोध झालेल्या आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारासह नेत्यांची देखील धाकधूक वाढली आहे. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्यामुळे गावागावांमध्ये सरपंच कोण ? या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. गावचे सरपंच पद मिळवण्यासाठी अनेकांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे.

९८५ मतमोजणी यंत्रावर आज होणार मोजणी
जिल्ह्यातील १९५ ग्रामपंचायतींसाठी ७६६ मतदान केंद्रांवर १ हजार ५२३ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मतदानासाठी लावण्यात आले होते. मंगळवारी ९८५ मतदान काउंट यंत्रावर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...