आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघराच्या पडवीत जेवण करत असताना वरांडी अंगावर पडल्याने लक्ष्मण चंद्रभान सोनवणे (वय ४५), सारिका एकनाथ सोनवणे (वय ५) या चुलता-पुतणीचा जागीच मृत्यू झाला. तर वैजंताबाई सोनवणे या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजेता तालुक्यातील वेल्हाळे येथे घडली.
लक्ष्मण व एकनाथ सोनवणे हे दोघे भाऊ व लहान मुल घराच्या पडवीत जेवणासाठी बसले असता पडवीवरील सिमेंटची वरांडी अचानक लक्ष्मण व सारिका यांच्या डोक्यावर पडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य मुलं बालंबाल बचावले. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. मृतांवर पालिकेच्या कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात लक्ष्मण व सारिकावर वेल्हाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.