आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Crack Down On Organized Mobs By Cracking Down On Police Inspectors; Block The Way Of Traders In Kukanee, While Responding To The Youth Association's Bandh| Marathi News

संताप:पोलिस निरीक्षकांवर कारवाई करून संघटीत झुंडशाहीचा बंदोबस्त करा; कुकाण्यात व्यापाऱ्यांचा रास्ता रोको , तर युवक संघटनेच्या बंदला प्रतिसाद

कुकाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यावर कारवाई करावी, घरफोड्या, चोऱ्यांचा तपासातील अपयश, वाढलेले अवैध धंदे बंद करावेत, संघटीत झुंडशाहीचा बंदोबस्त करावा आदी मागण्यांसाठी व्यापारी संघटनेतर्फे गुरुवारी सकाळी कुकाणे येथे बसथांब्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर युवक संघटनेच्यावतीने याच मागणीसाठी पुकारलेल्या बंदलाही प्रतिसाद मिळाला. नेवासे पोलिस निरीक्षक करे यांच्या संभाषण क्लिप प्रकरण लाचलुचपत विभागाकडे द्यावे, घरफोड्या, चोऱ्यांचा तपासातील अपयश आदी मागण्यांसाठी कुकाणे व्यापारी संघटनेतर्फे नेवासे शेवगाव मार्गावर कुकाणेत रास्ता रोको, तर निरीक्षक करे यांच्या कार्यपद्धतीमुळे जातीधर्मात तेढ वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी यामागणीसाठी युवा संघटनेतर्फे कुकाणे बंदच्या आवाहनास व्यावसायिकांनी कडकडीत बंद ठेवत प्रतिसाद दिला.

कुकाणे बसथांब्यांजवळ रास्ता रोको आंदोलनात भाजप नेते चंपालाल बोरा, मनसे नेते विलासराव देशमुख, व्यापारी संघटनेचे नेते जवाहर भंडारी मुस्लिम समाजाचे नेते रसुलभाई इनामदार लहुजी सेनेचे नेते भैरवनाथ भारस्कर ,जाणता राजा मंडळाचे राहुल जावळे, माउली तोडमल आदींची भाषणे झाली भाषणात यासर्वांनी पोलिस अधिकारी व स्थानिक झुंडशाही बद्दल संताप व्यक्त केला.

श्रीरामपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. घरावर दरोडा पडून वर्ष उलटले तरी तपास न लागल्याने शामसुंदर खेसे यांनीही उपअधीक्षक मिटके यांना निवेदन दिले. ज्येष्ठ नेते अशोक चौधरी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष बरमेचा, शिवसेनेचे राजेंद्र बागडे, जावेद शेख, राजेंद्र राऊत, जाणता राजा मंडळाचे युनुस नालबंद ,समीर पठाण सरपंच एकनाथ कावरे, राजेंद्र बाफना, बाबासाहेब गोल्हार, संदीप वाघ, सुशांत सोनवणे, अक्षय कचरे आदींचा आंदोलनात समावेश होता. शेवगावचे पोलिस निरीक्षक पुजारी, सोनई ठाण्याचे निरीक्षक माणिकराव चौधरी, शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामचंद्र कर्पे, नेवाशाचे सहायक निरीक्षक रामचंद्र थोरात, उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे व गावंडे आदींनी बंदोबस्त ठेवला. प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून आंदोलनकर्त्यांनी वाहनांना जाण्यास मुभा दिली होती.

पोलिसांची दुकाने उघडण्यास बळजबरी
व्यापारी संघटनेच्यावतीने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आला असताना कुकाणे दुरक्षेत्राच हवालदार कोळपे यांनी पोलिस वाहनात येत बसथांबा परिसरात काही दुकाने उघडण्यास बळजबरी केली. पण व्यापाऱ्यांनी त्यांना जुमानले नाही. त्याप्रकाराचा उल्लेख वक्त्तांनी भाषणात करुन कोळपे यांचेवर कारवाईची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...