आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनमधील युध्दामुळे दिवसेंदिवस इंधनाच्या किमतीत होत असलेल्या दर वाढीमुळे नगरकरांनी आता इलेक्ट्रिक दुचाकींना पसंती दाखवली आहे. नगरच्या वाहन बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीत दोन महिन्यात दुप्पटीने वाढ झाली आहे. दोन महिन्यांत नगरमध्ये तब्बल पाच हजार इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. बाजारात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या नव्या इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये पूर्वीपेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी बसवल्यामुळे दोन तासांच्या चार्जिंगमध्ये ही दुचाकी ९० किमी धावणार आहे. दरम्यान, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विक्रीत आणखी वाढ होणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे वाहनांवरील खर्चाचे बजेट देखील वाढले आहे. त्यावर पर्याय म्हणून सध्या बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीची क्रेझ आली आहे. काेराेनाच्या कालावधीत वाहन विक्रीत काहीशी घट झाली असतानाच आता पेट्राेल-डिझेलएेवजी इलेक्टिक्स वाहने खरेदीवर नगरकरांनी भर दिला आहे. नगरच्या वाहन बाजारात सध्या विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल दुचाकी विक्रीसाठी येत असून, ६८ हजारांपासून ते १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीसाठी आलेल्या आहे.
वर्षभरापुर्वी अनेक शोरुमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी केवळ शो पुरत्या दिसत होत्या. आता मात्र इलेक्ट्रिक दुचाकींना मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक दुचाकीत मालवाहू दुचाकीपासून ते महिलांसाठी विशेष दुचाकी आलेल्या आहेत. मालवाहू इलेक्ट्रिक दुचाकी ही २५० वॅटची असून, १२०-१२५, ७०-,८०, ५५-,६० किलो मीटर धावण्याची क्षमता आहे. तीन तासांच्या बॅटरी चार्जिंगवर ही दुचाकी धावते.
ई-बाईकमुळे इंधन, मेंटेनन्स खर्च कमी, प्रदूषण टळते
पेट्रोलवरील दुचाकीसाठी नोकरदार व्यक्तीला महिन्याला दोन ते २५०० रुपये खर्च येतो. ६० ते ८० किलोमीटर ई बाईक चालवण्यासाठी ४ तास बॅटरी चार्जिंग करावी लागते. त्यासाठी महिन्याला चार ते पाच युनिट वीज लागते. त्यावर खर्च येतो ३५ ते ४० रुपये, तर हीच पेट्रोलवरील दुचाकी असल्यास त्याचा दररोजचा खर्च हा १७२ रुपये येतो. या ई-बाईकमुळे हवेतील ध्वनी, प्रदूषण होत नाही. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत नाही. त्याचबरोबर या दुचाकींना ३ वर्षांची गॅरटी असल्यामुळे कुठेच मेटेंनन्स लागत नाही.
महिन्याला १७०० वाचले
यापूर्वी असलेल्या दुचाकीसाठी महिन्याला पेट्रोलसाठी दोन हजारांचा खर्च येत होता. मात्र ई बाईक घेतल्यानंतर तो खर्च अवघा २५० रुपयांवर आला आहे. पेट्रोलसाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. पेट्रोल दरवाढ झाल्यामुळे आमची ई बाईकमुळे मोठी आर्थिक बचत झाली आहे.
सॅम्युएल गायकवाड, ग्राहक.
फरक काय? ई-बाईक व पेट्रोल दुचाकीत
सर्वसामान्य नोकरदार व्यक्तील पेट्रोलवरील दुचाकीसाठी महिन्याला दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. गेल्या दोन महिन्यात पेट्रोलचे दराने शंभर रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले आहेत. दररोज ७० ते ८० किलो मीटर जाण्यासाठी एक लिटर पेट्रोलवर ११० रुपये खर्च येतो. शिवाय प्रदूषण देखील होते. त्याचा परिणाम आरोग्यावर होता. शिवाय अन्य मेटेनेंस खर्च देखील लागतो.
१ हजार वॅटपासून ते २५० वॅटची इलेक्ट्रिक दुचाकी
इलेक्ट्रिक्स दुचाकी बाजारात सध्या १ हजार वॅटपासून ते २५० वॅटची इलेक्ट्रिक्स दुचाकी विक्री आहे.विशेष म्हणजे पुर्वीपेक्षा जास्त उर्जा देणार्या बॅटरी नव्या दुचाकीत बसविण्यात आल्या आहेत.८४ हजार ८८ हजार ९२ हजार बॅटरीची क्षमता असलेल्या दुचारी ५५, ७० व १२५ किलोमीटर धावणाऱ्या आहेत. त्याला तीन तास चार्जिंग पुरेशी आहे.
नगरमध्ये प्रथमच ई बाइकची निर्मिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदूषण न होणाऱ्या वाहन निर्मितीवर भर देण्याचे आवाहन केल्यानंतर आम्ही ई-बाइक नगरच्या औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांत तयार केली आहे. आमच्या ई जोश स्कूटरवर खड्यांमधूनही आरामदायी प्रवासाचा अनुभव चालकास मिळेल''
श्रीकृष्ण जोशी, चेअरमन, आकाश प्रिसिजन कॉम्पोननट॰स प्रा. लि.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.