आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाणिज्य वार्ता:विश्वासार्हता, दागिन्यांची आकर्षक व्हरायटी हे पोखरणा ज्वेलर्सचे वैशिष्ट्‌ये : जगताप

नगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरमधील ए. एच. पोखरणा ज्वेलर्सने डायमंड व टेंपल ज्वेलरी महोत्सव घेवून मौल्यवान खरेदीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. विश्वासार्हता आणि आपुलकीची सेवा तसेच दागिन्यांची आकर्षक व्हरायटी या दालनाचे वैशिष्टये आहे, असे प्रतिपादन नगरसेविका शीतल जगताप यांनी केले.

ए.एच.पोखरणा ज्वेलर्सच्या सर्जेपुरा येथील सुवर्ण दालनाचा प्रथम वर्धापनदिन १४ मार्चला साजरा करण्यात आला. यानिमित्त या दालनात १४ ते १६ मार्च या कालावधीत डायमंड ज्वेलरी एक्झिबिशेनचे आयोजन केले आहे. यात डायमंड ज्वेलरी मजुरीवर १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच १४ ते २१ मार्च या कालावधीत टेंपल ज्वेलरी फेस्टिव्हल आयोजित केला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन नगरसेविका जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महिला बालकल्याण समिती उपसभापती मीनाचोपडा, सविता रमेश फिरोदिया, प्रतिभा धूत, लता कटारिया, ज्योती गांधी, प्रियंका चंगेडिया, राखी गांधी, निता पोखरणा, पूजा पोखरणा, अंकिता पोखरणा, आदेश चंगेडिया, सागर गांधी, हिरालाल पोखरणा, अमित पोखरणा, वसंत पोखरणा, आकाश पोखरणा, नयन पोखरणा आदी उपस्थित होते.

स्वागत निता पोखरणा यांनी केले. पूजा पोखरणा म्हणाल्या, वर्षभरापूर्वी सर्जेपुरा येथे भव्य सुवर्ण दालन सूरू करून मौल्यवान खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विशेष महोत्सव व मजुरी सवलत योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ए. एच. पोखरणा ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे. आभार अमित पोखरणा यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...