आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचे श्रेयही घ्यावे ; त्यांचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न : आगरकर

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागला. याचा आनंद आहे. या पुलासाठी ज्यांनी प्रयत्न केले, पाठपुरावा केला, त्यांनी या कामाचे श्रेय घेणे अपेक्षित आणि उचितच आहे. मात्र, शहरात पहिल्यांदा उड्डाणपूल मंजूर झाला, त्यावेळी तो होऊ नये म्हणून ज्यांनी देव पाण्यात घातले, ज्यांनी ठेकेदाराला पळवून लावले, तो इतिहास नगरकर विसरलेले नाहीत. आज हेच श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत उड्डाणपुलासह शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचे श्रेयही त्यांनी घ्यावे, असा टोला माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी लगावला आहे.

तत्कालीन राज्य सरकारकडून सक्कर चौकातील अक्षता गार्डन ते कोठी रोड चौकापर्यंत पहिला उड्डाणपूल मंजूर झाला होता. त्याची निविदा काढण्यात आली. पुलाच्या कामासाठी रस्ता रुंदीकरणही केले होते. प्रत्यक्ष काम सुरू होत असताना या कामात अडथळे आणण्यात आले. काम करणाऱ्या कामगारांना दहशत करून पळवून लावण्यात आले. त्यामुळे या पुलाचे काम रद्द करण्याची वेळ आली. त्यानंतर हा उड्डाणपूल व्हावा, यासाठी अनेक पक्षीय आंदोलने झाली. तत्कालीन माजी खा. दिलीप गांधी, माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांनी पुलाला निधी मिळावा म्हणून प्रयत्न सुध्दा केले. अखेर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुलासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. विद्यमान खासदार सुजय विखे यांनी कामाचा पाठपुरावा केला. मात्र, आज उड्डाणपुलाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असताना ज्यांनी पुल होऊ नये म्हणून आडकाठ्या आणल्या, कामगार पळवून लावले, त्यांची श्रेय घेण्यासाठी चाललेली लाजिरवाणी धडपड सुरू असल्याचे दिसते, याला काय म्हणावे, असा सवाल त्यांनी केला आहे.

कारभाऱ्यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेचे भानही ठेवावे
उड्डाणपुलामुळे नगरकरांना दिलासा निश्चितच मिळणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या देखील मार्गी लागेल. त्यामुळे ज्यांनी पुलासाठी प्रयत्न केले, त्यांना या कामाचे श्रेय नगरकर निश्चितच देणारच आहेत. मात्र, कारभाऱ्यांनी उड्डाणपुलाचा आनंद व्यक्त करताना शहरातील इतर रस्त्यांच्या दुरावस्थेचे भानही ठेवायला हवे, अशा शब्दात आगरकर यांनी चमकोगिरी करणाऱ्यांना फटकारले आहे.

बातम्या आणखी आहेत...