आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने ५ जानेवारी रोजी प्रतिदिन ७ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेवर १० हजार ७० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून एकदिवसीय गाळपातील नवा उच्चांक प्रस्थापित केला. या एकदिवसीय उच्चांकी ऊस गाळपाचे श्रेय ज्ञानेश्वरच्या ऊस उत्पादक शेतकरी-कामगारांना आहे, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले यांनी दिली.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने कारखान्याने ५ जानेवारी अखेर ६९ दिवसांत एकूण ५ लाख ६६ हजार ३०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. मागील सन २०२१-२२ च्या हंगामात १५ डिसेंबर रोजी ९५८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून एकदिवसीय उच्चांक केला होता. तो उच्चांक या हंगामात मोडून १० हजार ७० मेट्रिक टन ऊसाचे उच्चांकी गाळप केले आहे. याबरोबर ५ जानेवारी अखेर सहवीज निर्मिती प्रकल्पातून ३ कोटी ७४ लाख ७६ हजार ९६० यूनिट विज निर्मिती झाली,त्यापैकी २ कोटी १९ लाख ९३ हजार ९६० यूनिट वीज महावितरणला निर्यात करण्यात आली आहे. तर डिस्टिलरी मधून ३१ लाख ६३ हजार ५४५ लिटर रेक्टरीफाईड स्पिरिट व २८ लाख ६० हजार १५ लीटर इथेनॉल निर्मिती झाली आहे.
माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,तज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व संचालक मंडळाने गाळपात उच्चांक केल्याबद्दल शेतकरी, खाते प्रमुख, सुपरवायझर, कामगार-कर्मचारी, उस तोडणी कामगार यांचे अभिनंदन केले.
कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप होईल या सुरु असलेल्या हंगामात गाळपास येत असेलेल्या उसाला प्रतिटन २४०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता संबधित शेतकऱ्यांचे बँक खाती जमा करण्यात आला आहे. यावर्षीचा अंतिम साखर उतारा चांगला राहिल,त्यामुळे अंतिम उस भाव ही चांगला असेल.कारखान्याचे कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे वेळेत गाळप होईल, असा विश्वास व्यक्त करून सर्वांच्या सहकार्याने कारखाना प्रगतीचा आलेख असाच उच्चांवत राहील, असे कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.