आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन सुन्न करणारे दृश्य:अहमदनगरमध्ये एकाच वेळी 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, स्मशानभूमीत रुग्णवाहिकांची रांग

अहमदनगर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी 2233 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरूवारी एकाच दिवशी २२३३ तर काल शुक्रवारी २०२२ रुग्णांना कोरोना झाल्याची नोंद झाली. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील धक्कादायक होते. एकाच दिवशी ४२ कोरोना रुग्णांवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अमरधाममधील २ विद्युत दाहिनीत २० आणि उरलेल्या मृतदेहांवर लाकडाच्या सरणावर मृतदेह रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, नगरमध्ये चार-चार मंत्री असूनही कोरोनामुळे रुग्ण मरत आहेत. एकाच दिवशी ४२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

गतवर्षीच दिव्य मराठीने केले होते सतर्क, पण प्रशासनाला जाग आली नाही

करोना बाधितांचा आकडा वाढत असताना नगरमध्ये आता मृत्यूचे थैमान माजले असून आरोग्य यंत्रणा आणि अमरधाममधील अंत्यविधी करणारी व्यवस्थाच कोलमडली आहे. महापालिकेकडे एकच शववाहिनी आहे.त्यात एकाचवेळी अनेक मृतदेह कोंबून नेले जातात. विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. शववाहिकेतून एकाचवेळी १२ मृतदेह नेले जात असल्याचा धक्कादायक प्रकार दिव्य मराठीने उघडकीस आणला होता. त्यावेळी आणखी एक शववाहिनी घेण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र, अशी व्यवस्था झालेली नाही. महापालिकेने त्याकडे दुर्लक्षच केले आणि जिल्हा प्रशासनानेही त्याची कसलीच दखल घेतली नाही.

पुन्हा एकावर एक ठेवून आणले मृतदेह

गुरूवारची रात्र नगर शहरातील अंत्यसंस्काराचे एक विदारक चित्र घेऊन समोर आली. एका शववाहिकेत सहा मृतदेह एकावर एक ठेवून नेण्यात आले. महापालिकेची यासंबंधीच यंत्रणा अपुरी असल्याने ही वेळ आल्याचे कर्मचारी सांगतात. नगरच्या रुग्णालयांत शहरासोबतच ग्रामीण भागातील रुग्णही दाखल होतात. त्यांचा मृत्यू झाल्यावर नियमाप्रमाणे मृतदेहांवर येथेच अंत्यसंस्कार करण्यात येतात. यासाठी नगरच्या अमरधाममधील विद्युत दाहिनीचा वापर केला जातो. मात्र, तेथे दिवसाला केवळ २० अंत्यसंस्कार होऊ शकत आहेत. त्यासाठी नातेवाकाईंना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने अंत्यस्कार करण्यासही सुरुवात झाली आहे. त्यासाठी ओटे अपुरे पडत असल्याने जमिनीवरच सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहेत.

जिल्ह्यात कोरोनामुळे रोज सरासरी 15-20 मृत्यू

करोना बाधित रुग्णवाढीच्या बाबतीत नगर जिल्हा देशातील टॉप टेन जिल्ह्यांमध्ये आहे. दिवसाला येथे दोन हजारांवर नवे रुग्ण आढळून येत असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या बारा हजारांच्या घरात गेली आहे. आतापर्यंत १२७० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे दररोज सरासरी १५ ते २० जणांचा मृत्यू होत आहे. काल हा अकडा ४८ वर गेल्याने यंत्रणा कोलमडून पडली. अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेतून मृतदेह नेले जातात. नंबर येऊपर्यंत मृतदेह तसेच शववाहिकेत तासंतास पडून असतात. बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्या नातेवाईकांनीही नगर शहरात येऊन तासंतास ताटकळत बसावे लागते.

प्रशासानाकडून आढावा बैठका घेण्याचा नुकताच फार्स केला जातो. त्यात करोना बाधिकत रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूणच प्रशासन व्यवस्थेबद्दल संतापाचे वातावरण पसरले आहे.

बातम्या आणखी आहेत...