आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मद्यपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मद्य सेवन करून दुचाकी वाहन चालवणाऱ्याविरूध्द कोतवाली पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. संपत बंकट काळे (वय ३८, रा. नवीन चांदगाव पोस्ट, उस्थळ दुमाला, नेवासा) असे वाहन चालकाचे नाव आहे.

याप्रकरणी पोकॉ याकूब सय्यद यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. ३ रोजी रात्री आठ वाजता पोलिस उपनिरीक्षक कचरे, याकूब सय्यद व पोकॉ खताडे यांनी नाकाबंदी केली असता दुचाकी वाहन चालक एमएच ०६ एव्ही ०९५४ मद्य सेवन केल्याचा संशय आला. त्यास त्याचे नाव विचारले असता संपत काळे असे सांगितले. त्यास वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविले असता तो मद्यार्काच्या अमलाखाली असल्याचा अहवाल आला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...