आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या वसतीगृह अधीक्षकावर गुन्हा

अकोले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपुंजे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील ७ विद्यार्थ्यांना जळत्या लाकडाने बेदम मारहाण करणाऱ्या वसतिगृह अधीक्षकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन माराहाण झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर वसतिगृह अधीक्षक अश्विन पाईकराव यास तत्काळ निलंबित करण्याची मागणी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली होती. त्यानुसार चौकशी पूर्ण करून अहवाल सादर झाल्यानंतर पाईकराव याला निलंबितही केले आहे.

शिरपुंजे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा वसतिगृह अधीक्षक अश्विन पाईकराव याने जळत्या लाकडाने आश्रमशाळांतील ७ विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी आश्विन पाईकराव याच्या विरोधात राजूर पोलिस ठाण्यात आश्रमशाळेतील जखमी मुलांच्या पालकांनी फिर्याद दाखल केली. राजूर पोलिस ठाण्यात आश्विनकुमार पाईकरावला याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक १९७९ मधील नियम ३ चा भंग करून शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी जबाबदार धरून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.

तर नियम १९७९ मधील नियम ४ चा पोटनियम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन आश्विनकुमार पाईकराव यास पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदिप गोलाईत यांनी दिली. ३ डिसेंबर रोजी थंडीचा कडाका वाढल्यावर आश्रमशाळांतील ७ विद्यार्थ्यांनी लाकडे पेटवून शेकोटी केली होती.

हा प्रकार वसतिगृह अधिक्षक अश्विन पाईकराव यांनी पाहिला. राग आल्यामुळे पाईकराव याने विद्यार्थ्यांना जळत्या लाकडाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या विद्यार्थ्यांच्या पायावर, पाठीवर आणि अन्य ठिकाणी जखमा झाल्या. ही घटना पिडीत विद्यार्थ्यांच्या पालकांना समजल्यानंतर विद्यार्थी पालकांसोबत राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

पोलिस तपास सुरू
राजूर पोलिसांनी फिर्यादीवरून अश्विनीकुमार अर्जुन पाईकराव, रा. शासकीय आश्रमशाळा, शिरपुंजे याच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ५०४ व बाल अधिनियम २००० चे कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राजूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मुढे हे करीत आहेत.

जुन्या गाद्या जाळल्या
राजूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आश्रमशाळेत वसतीगृह अधीक्षक अश्विन पाईकराव यांच्या ताब्यातील मुलांनी मुख्याध्यापकांच्या सांगण्यानुसार आश्रमशाळेच्या आवारात जुन्या वापरात नसलेल्या गाद्या पेटवल्याची घटना घडल्याचे दिसून आले. याचा राग आरोपी पाईकराव यास आला. त्यानंतर त्याने विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...